पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारताला सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व देणे गरजेचेः फ्रान्स

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (Reuters)

भारत, जर्मनी, ब्राझील आणि जपानसारख्या देशांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) स्थायी सदस्यत्व देणे गरजेचे असल्याचे मत फ्रान्सच्या प्रतिनिधीने संयुक्त राष्ट्रात म्हटले आहे. संयुक्त राष्ट्राच्या या अत्यंत महत्वाच्या संस्थेत या देशांना सहभागी करणे फ्रान्सची प्राथमिक रणनिती असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

वॉरेन बफे यांच्याकडून वारसदाराबद्दल सूचक संकेत

संयुक्त राष्ट्रात फ्रान्सचे स्थायी प्रतिनिधी फ्रान्सवा डेलातरे यांनी मागील आठवड्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, नितीनुसार फ्रान्स आणि जर्मनीची निती मजबूत आहे जी सुरक्षा परिषदेचा विस्तार करण्यासाठी एकत्रित काम करणे आणि चर्चेत यशस्वी होण्याशी निगडीत आहे. यामुळे सुरक्षा परिषदेचा विस्तार होईल. भारत दीर्घकाळापासून सुरक्षा परिषदेत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नरत आहे. 

दरम्यान, अनेक दिवसांपासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. परंतु, चीनच्या विरोधामुळे भारताला आपले ईप्सित साध्य करता आलेले नाही. सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्यांकडे व्हेटोचा अधिकार आहे. यामध्ये रशिया, चीन, अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सचा समावेश होतो.