पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य ही काही एकवेळची गोळी नाही - सरन्यायाधीश

सरन्यायाधीश रंजन गोगोई

देशातील न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य ही एकवेळा घ्यायची गोळी नाही. कोणत्याही स्थितीत न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे, असे देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या सरन्यायाधीशांच्या शिखर परिषदेमध्ये बीज भाषण करताना रंजन गोगोई यांनी न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याचा मुद्दा प्रभावीपणे मांडला.

Maharashtra Budget : शेतकरी आणि सामान्य माणूस राज्य विकासाचा 'गाभा'

ते म्हणाले, न्यायव्यवस्था स्वतंत्र असली पाहिजे, ही प्रत्येक देशातील नागरिकाची इच्छा असते. त्यामुळेच स्वातंत्र्य हा या न्यायव्यवस्थेचा आत्मा आहे. ते एकावेळच्या गोळीसारखे नक्कीच नाही. स्वातंत्र्य सातत्याने मिळत राहिले पाहिजे. न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. 

अर्थसंकल्प फुटला, जाहिराती आधीच कशा तयार झाल्या?; विरोधकांचा सवाल

देशाची घटना आणि त्यातील तरतुदी यांचे सरंक्षण करण्यासाठी न्यायव्यवस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, असे सांगून रंजन गोगोई म्हणाले, भारताचा विचार केल्यास कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांच्यामध्ये एकमेकांबद्दल आदराची भावना आहे. न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य आणि न्यायाधीशांचे स्वातंत्र्य या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण खंबीर आणि प्रतिसादात्मक न्यायव्यवस्थेसाठी हे दोन्ही घटक एकमेकांवर अवलंबून आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.