पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारत दहशतवाद्यांचे खरे चेहरे जगासमोर आणणार - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावर पहिले भाषण केले. लालकिल्ल्यावर मोदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मोदींनी संपूर्ण देशाला संबोधित केले. यावेळी मोदींनी पाकिस्तानचे नाव न घेता निशाना साधला आहे. ' भारत दहशतवादाविरोधात खंबीरपणे उभा आहे आणि दहशतवाद्यांना आश्रय देणारे आणि आर्थिक मदत करणाऱ्यांचे सत्य भारत जगाच्या समोर आणत आहे', असे मोदींनी सांगितले.  

राज्याला दुष्काळमुक्त करणार; स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांचा निर्धार

पुढे मोदींनी असे सांगितले की, 'भारत मोठ्या सामर्थ्याने आणि ताकदीने दहशतवाला लढा देत आहे. दहशतवाद्याला आश्रय देणारे आणि त्याला आर्थिक पुरवठा करणाऱ्या कोणत्याही देशाचे समर्थन करणार नाही. आम्ही दहशतवाद्यांचे खरे चेहरे जगासमोर आणणार आहोत. आम्ही जगातल्या इतर देशांचा पाठिंबा घेऊन दहशतवाद्यांना आश्रय देणारे, आर्थिक मदत करणाऱ्यांविरोधात लढा देणार आहे. त्यांचे खरे रंग जगासमोर घेऊन येणार आहोत.'

कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये पहिला स्वातंत्र्य दिवस 

दरम्यान, बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका दहशतवादी हल्ल्याचे शिकार झाले आहेत. त्यामुळे भारत दहशतवादाविरोधात लढत असताना जागतfक व्यासपीठावर आपली भूमिका ठामपणे मांडत असल्याचे मोदींनी सांगितले. दरम्यान, मोदींनी अफगाणिस्तानला शुभेच्छा दिले जे चार दिवसानंतर १०० वा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहेत.  

रक्षाबंधनच्या दिवशी बहीण-भावाचा अपघात; भावाचा मृत्यू