पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Independence Day: देशभरामध्ये ७३ व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह

७३ वा स्वातंत्र्य दिन

देशभरामध्ये  ७३ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे. राज्यासह देशभरातील विविध भागामध्ये ध्वजारोहण करत सर्व जण एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. स्वतंत्र्य दिनानिमित्त देशभरातमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्या आहे. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सर्व देशवासियांना ७३ व्या स्वतंत्रता दिनाच्या आणि रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी ध्वजारोहण केले. त्याचसोबत त्यांनी सर्व देशवासियांना देखील स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस भैय्याजी जोशी यांनी नागपूर येथील आरएसएसच्या मुख्यालयामध्ये ध्वजारोहण केले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत देखील उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

लडाखमध्ये ७३ व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पहायला मिळाला. लडाखचे भाजप खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी लेह येथे ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी स्थानिकांसोबत नृत्य केले.

उत्तराखंड येथील चंद्रेश्वर महादेव मंदिरामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त खास सजावट करण्यात आली आहे. मंदिरातील शिवलिंगाशेजारी भारताच्या झेंड्यातीलतीन रंगाप्रमाणे फुलांची सजावट करण्यात आली आहे.

तामिळनाडू येथे एका कलाकाराने कलिंगडावर कोरीवकाम करत सर्वांना ७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने कलिंगडावर महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग, जवाहरलाल नेहरु, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सरोजीनी नायडू यांचे चेहरे कलिंगडावर कोरले.

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर येथे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या हस्ते काँग्रेस कार्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस नेते राहुल गांधी, कबिल सिब्बल, बी एस हुडा, अहमद पटेल उपस्थित होते.

मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या.