पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गेल्या १२ तासांत देशात कोरोनाचे ३०२ रुग्ण

कोरोनाबाधितांवर उपचार करणारे डॉक्टर

भारतात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी  आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे, मात्र दिवसेंदिवस देशात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. गेल्या १२ तासांच देशात या विषाणू बाधितांचे ३०२ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती आरोग्यविभागानं दिली आहे. 

राज्यात मुंबईनंतर पुणे दुसऱ्या क्रमांकाचं कोरोनाचं हॉटस्पॉट

बारा तासांत वाढलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे देशात  कोरोना बाधितांचा आकडा हा ३ हजार ३७४ वर पोहोचला आहे. या आकड्यामध्ये  बरे झालेल्या आणि डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांचाही  समावेश आहे. आतापर्यंत बाधितांपैकी २६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ७७ लोकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. 

मोरांना पाहण्यासाठी मुंबईकरांकडून लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन

देशात केरळ, महाराष्ट्र, दिल्ली, आंध्रप्रदेश, राज्यस्थान, उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ही अधिक आहे. एकट्या महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा हा ६०० पार गेला आहे. राज्यात मुंबईत  कोरोना बाधितांची संख्या ही अधिक आहे. मुंबईत आतापर्यंत ३३० रुग्ण आढळले असून केवळ मुंबईत आतापर्यंत २२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

फक्त दिवे बंद करा, इतर उपकरणं सुरु ठेवण्याचं महापारेषणचं आवाहन