पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्नाटकमध्ये काँग्रेस नेत्यांच्या घरी, महाविद्यालयांवर इन्कम टॅक्सचे छापे

जी परमेश्वरा

कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते जी परमेश्वरा यांच्या निवासस्थानी आणि त्यांच्या संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयांवर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी छापे टाकले. माजी केंद्रीय मंत्री आर एल जलप्पा यांच्या मालकीच्या वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांवरही प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. 
या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना परमेश्वरा म्हणाले, जर त्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये छापे टाकून तेथे कागदपत्रे तपासायची असतील, तर करू दे. मला त्याबद्दल काहीही आक्षेप नाही. 

१० वर्षांच्या तुलनेत मुंबईत सर्वात कमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

प्राप्तिकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परमेश्वरा यांच्याशी संबंधित एकूण ३० ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. परमेश्वरा यांच्या नेतृत्त्वाखालील न्यासाकडून या वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार चालतो. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार असल्याचे प्राप्तिकर विभागाला दिसून आले. त्यामुळे गुरुवारी हे छापे टाकण्यात आले. 

शिवसेनेत धुसफूस कायम, कल्याणमध्ये २६ नगरसेवकांचे राजीनामे

दरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हे छापे राजकीय हेतूने टाकण्यात आले असल्याची टीका केली. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी हे कारस्थान रचण्यात आले आहे. पण आम्ही त्यांच्या दबावाला बळी पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.