पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कामगार संघटनांच्या भारत बंदला राहुल गांधींनी असा दिला पाठिंबा

राहुल गांधी

केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात देशातील कामगार आणि कर्मचारी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या भारत बंदला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला. भारत बंदला पाठिंबा देताना राहुल गांधी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे.

पुण्यात आरोपींना शिक्षा देण्याचे प्रमाण वाढले, खुनाच्या घटनाही वाढल्या

राहुल गांधींच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सरकारच्या लोकविरोधी, कामगारविरोधी धोरणांमुळे बेरोजगारी निर्माण झाली आहे. त्यांच्यामुळे देशातील सार्वजनिक उपक्रम कमकुवत केले जात आहेत. ज्याचा फायदा या दोघांच्या भांडवलदार मित्रांना व्हावा. आज देशातील २५ कोटी कामगारांनी भारत बंद पुकारला आहे. माझा त्यांना सलाम.

देशातील प्रमुख दहा कामगार संघटनांनी बुधवारी २४ तासांचा भारत बंद पुकारला आहे. या बंदमुळे देशाच्या काही राज्यांतील सेवा विस्कळीत झाल्या आहेत. महाराष्ट्रात बंदला समिश्र प्रतिसाद मिळतो आहे. 

इराकमधील भारतीयांसाठी आणि हवाई प्रवासासाठी केंद्राचा महत्त्वाचा सल्ला

कंत्राटी कामगारांना समान कामासाठी समान वेतन मिळाले पाहिजे. काही जण एकसारखे काम करतात. पण एकाला दुसऱ्या पेक्षा कमी पगार मिळतो, हा अन्याय असल्याचे कामगार संघटना सिटूचे सरचिटणीस तपन सेन यांनी म्हटले आहे. कामगार कायदा सुधारणांसंदर्भातील सर्व विधेयके रद्द करण्यात यावीत, अशीही आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.