पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊननंतर नरेंद्र मोदी यांचे दैनंदिन काम नेहमीप्रमाणेच, फक्त...

नरेंद्र मोदी यांनी सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून मंत्रिमंडळाची बैठक घेतली.

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोजच्या दिनक्रमात अजिबात बदल झालेला नाही. ७, लोककल्याण मार्ग, या आपल्या शासकीय निवासस्थानातून नरेंद्र मोदी रोजच्या रोज सर्व कामे करताहेत. त्यांना भेटायला येणाऱ्या व्यक्तींची भेटही घेत आहेत. अर्थात सोशल डिस्टन्सिंगचा वापर करूनच आणि सर्व खबरदारी घेऊनच ही कामे सुरू आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यरत एका अधिकाऱ्यानेच ही माहिती दिली.

लवकरच पाच मिनिटांत कोरोनाचा अहवाल देणारे टेस्ट किट, १०० रुपयांत चाचणी

नरेंद्र मोदी सोमवारी संध्याकाळी विविध स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींशी आणि परदेशात असलेल्या भारताच्या काही राजदूतांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत. त्या त्या देशात या आजाराविरोधात लढण्यासाठी काय उपाय योजले जात आहेत. परदेशातील दूतावासात कार्यरत आपले अधिकारी आणि कर्मचारी आपले काम कसे करताहेत, याची नरेंद्र मोदी माहिती घेतील. यातही विशेषतः ते अमेरिका, स्पेन आणि इटलीतील दूतावासातील अधिकाऱ्यांशी प्राधान्याने चर्चा करणार आहेत.

चैत्र नवरात्रीनिमित्त नरेंद्र मोदी यांचा सध्या उपवास सुरू आहे. येत्या २ एप्रिलपर्यंत हा उपवास सुरू राहणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पण त्यांचा दिनक्रम आणि भेटीगाठी यामध्ये फारसा बदल झालेला नाही. 

पाकची पुन्हा कुरघोडी, कोरोनातही काश्मिरचा मुद्दा रेटला

भेटायला येणाऱ्यांच्या संख्येत जाणीवपूर्वक कपात करण्यात आलेली नाही. केवळ येणाऱ्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान बघितले जाते. त्याच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी केली जाते. तो गेल्या काही दिवसांत परदेशात गेला होता का, याची तपासणी केली जाते. त्यानंतरच भेटीसाठी निवासस्थानी आत सोडले जाते. भेटीवेळीही सोशल डिस्टन्सिंगचा वापर केलेला असतोच.

नरेंद्र मोदी यांच्याकडे दिल्या जाणाऱ्या फाईल्स, त्यावरील त्यांच्या नोंदी यामध्येही कोणता बदल करण्यात आलेला नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.