पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीत अहमद पटेलांनी घेतली नितीन गडकरींची भेट आणि...

अहमद पटेल

महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेतील तिढा सुटलेला नसतानाच बुधवारी सकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. ही भेट शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल असल्याचे अहमद पटेल यांनी सांगितले आहे. तरीही बंद खोलीत झालेल्या या बैठकीत नक्की कोणती चर्चा झाली हे कोणालाच माहिती नाही.

ठरल्याप्रमाणे करा एवढाच प्रस्ताव - संजय राऊत

नितीन गडकरी यांना भेटून बाहेर पडल्यावर अहमद पटेल म्हणाले, मी केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नितीन गडकरी यांची भेट घेतली. ही भेट राजकीय स्वरुपाची नव्हती. महाराष्ट्रातील राजकारणावर या भेटीत कोणतीही चर्चा झाली नाही.

महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल लागून दोन आठवडे होत आले तरी अद्याप सरकार स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिलेला असला शिवसेनेला मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षे वाटून हवे आहे. त्याचबरोबर सत्तेत समान वाटा आहे. युती करण्याआधी भाजपने याला होकार दिला होता, असे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे कोणत्याही स्थितीत मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देणार नाही, असा पवित्रा भाजपने घेतला आहे. इतर मंत्रिपदांबाबत चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, असे भाजपचे नेते म्हणतात. यावरूनच सत्तास्थापनेचे घोडे अडले आहे.

भाजप-सेनेतील तिढ्याने संसद अधिवेशनाचा कार्यक्रम अनिश्चित

भाजपला सत्तेतून बाहेर ठेवून अन्य कोणत्या पद्धतीने सरकार स्थापन करता येईल का, याबद्दलही चाचपणी सुरू असल्याचे राजकीय वर्तुळातून समजते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी अचानक अहमद पटेल आणि नितीन गडकरी यांची भेट झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.