पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

९६० परदेशी नागरिक काळ्या यादीत, पर्यटन व्हिसाही केला रद्द!

दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात तबलीगी समाजाचा कार्यक्रम पार पडला होता.

दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील तबलीगी समाजाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या  ९६० परदेशी नागरिकांना काळ्या यादीत घालण्यात आले असून त्यांचा पर्यटन व्हिसा रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची परिस्थिती असताना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवर परदेशी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे आदेशही दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहे.  

राजकारण बाजूला ठेवून राष्ट्रहिताचा विचार करा, शहांचा काँग्रेसवर पलटवार  

लॉकडाऊनच्या परिस्थितीत कायद्याचे उल्लंघन करत दिल्लीतील निजामुद्दीन भागात तबलीगी समाजाचे मुख्यालय असलेल्या मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमाला मार्च  चीनसह  इंडोनेशिया, बांगलादेश आणि थायलंडमधून लोक आले होते. दक्षिण दिल्लीस्थित निजामुद्दीन मरकज येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या जवळपास ९ हजार लोकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. यातील ४०० जणांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाचे  सचिव लव अग्रवाल यांनी यासंदर्भात आकडेवारी दिली आहे.  

'राज्यातील तब्बल १४०० लोक मरकजमधील कार्यक्रमात सहभागी झाले होते'

तबलीगी समाजातील कार्यक्रमाच्या माध्यमातून तामिळनाडूमध्ये सर्वाधिक १७३, राजस्थानमध्ये ११, अंदामान निकोबार ९ दिल्ली ४७ , तेलंगणा ३३, आंध्र प्रदेश ६७ ,  आसाम १६, जम्मू-काश्मीर २२  रुग्ण आढळले आहेत महाराष्ट्र राज्यातही अनेक लोकांची तपाणीस करण्यात आली असून यातून हा आकडा आणखी वाढण्याची भिती निर्माण झाली आहे. दिल्लीतील या प्रकारामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकड्यात मोठी वाढ झाली आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम यापुढे कोठेही आयोजित केले जाऊ नयेत यापार्श्वभूमीवर यासंदर्भात कठोर कारवाईची पावले उचलण्यात येत आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:In the case of Tablighi Jamaat Nizamuddin 960 foreigners have been blacklisted and their tourist visas cancelled says Office of the Home Minister