पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... अन् कोर्टात निर्भयाच्या आईला अश्रू अनावर

निर्भयाची आई आशादेवी

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना फाशी देण्यासाठी नव्याने डेथ वॉरंट काढावे, अशी मागणी निर्भयाची आई आशादेवी यांनी बुधवारी न्यायालयात केली. आपली मागणी मांडताना त्या भावूक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. 

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी, पाच दिवसांचा आठवडा

न्यायालयात बाजू मांडताना आशादेवी म्हणाल्या, मी गेल्या दीड वर्षांपासून या न्यायालयात येते आहे. दोषींना त्यांच्या कायदेशीर मार्गांचा अवलंब करता यावा, याची मी सातत्याने वाट पाहते आहे. पीडितेची आई म्हणून मलाही काही अधिकार आहेत. यासाठीच मी आता चारही दोषींना तातडीने फाशी दिली जावी, अशी मागणी करीत आहे. त्यासाठी मी त्यांचे डेथ वॉरंट काढावे अशी मागणी करीत आहे.

दरम्यान, या प्रकरणातील एक दोषी पवन गुप्ता याला न्यायालयात बाजू मांडण्यासाठी कायदेशीर मदत देण्यास न्यायालयाने तयारी दर्शविली. कोणताही वकील आमची बाजू मांडण्यास तयार नसल्याचे पवन गुप्तांच्या वडिलांनी न्यायालयात सांगितले. 

ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावर मोदींनी व्यक्त केला आनंद, म्हणाले...

निर्भयाच्या वडिलांनीही पवन गुप्ताला कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याला विरोध केला. पण न्यायालय कायद्याप्रमाणेच चालेल असे सांगत न्यायालयाने मदत उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली.