पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ममतादीदींना पहिला धक्का; तीन आमदार, ६० नगरसेवक भाजपमध्ये दाखल

कैलाश विजयवर्गीय यांनी सर्वांचे भाजपत स्वागत केले

उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करतात हा नियम राजकारणातही लागू होतो. याचे दाखले यापूर्वीही अनेकवेळा पाहायला मिळाले आहेत. मंगळवारी पुन्हा एकदा त्याचे प्रत्यय राजधानी नवी दिल्लीमध्ये पाहायला मिळाला. पश्चिम बंगालमध्ये तेथील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर आता त्या पक्षातील आमदार, नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत. अशाच काही जणांनी मंगळवारी भाजपमध्ये औपचारिक प्रवेश केला. तृणमूल काँग्रेसचे दोन आमदार, कम्युनिस्ट पक्षाचा एक आमदार आणि तीन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विविध पक्षांच्या ६० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कोलकाताला लागून असलेल्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील हे सर्व लोकप्रतिनिधी आहेत.

सोलापुरात बीएसएनएलचा लाचखोर अभियंता सीबीआयच्या जाळ्यात

बिजपूरमधील सुभ्रांशू रॉय, नौपारामधील सुनील सिंग आणि बराकपोरमधील शिलभद्र दत्ता यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या ३० नगरसेवकांनीही यावेळी भाजप प्रवेश केला. हालीसहर, कांचरापारा आणि नैहाती महापालिकेतील हे सर्व नगरसेवक आहेत. सुभ्रांशू रॉय हे पश्चिम बंगालमधील भाजपचे निवडणूक व्यवस्थापन समितीचे निमंत्रक मुकुल रॉय यांचे पुत्र आहेत. सुनील सिंग हे बराकपोरमधील भाजपचे नवनिर्वाचित खासदार अर्जुन सिंग यांचे मेहुणे आहेत. शिलभद्र दत्ता हे सुद्धा मुकुल रॉय यांचे निकटवर्तीय आहेत.

गर्लफ्रेंडसाठी MBAचा पेपर फोडायला गेला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला

लोकसभा निवडणूक ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यात झाली. त्याचप्रमाणे तृणमूल काँग्रेसमधील आणि अन्य पक्षातील नेते सात टप्प्यात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज केवळ पहिल्या टप्प्यात काही नेते भाजपमध्ये आले आहेत, असे भाजपचे सरचिटणीस आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये १८ जागांवर विजय मिळवला. गेल्या निवडणुकीत या राज्यात भाजपला केवळ २ जागा मिळाल्या होत्या. त्याचवेळी तृणमूल काँग्रेसच्या जागा २२ पर्यंत खाली आल्या आहेत.