पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी CTO, HR विभाग नेमण्याची शिफारस

सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंग

सलग दोन लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आता काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नव चैतन्य आणण्यासाठी काय करता येईल, यावर गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय सॅम पित्रोदा यांनी एक अहवाल तयार केला आहे. दोन आठवड्यांपूर्वीच हा अहवाल पक्षाकडे सादर करण्यात आला. या अहवालामध्ये पक्षाला नव चैतन्य आणण्यासाठी २० शिफारशी करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने पक्षाचे पूर्णपणे एखाद्या कंपनीसारखे कॉर्पोरटायजेशन करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

अयोध्या वादावर ६ ऑगस्टपासून रोज सुनावणीः सुप्रीम कोर्ट

पक्षामध्ये एक मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) नेमला जावा, पक्षात मनुष्यबळ विकास विभाग (एचआर) आणला जावा, प्रत्येक विभागाला आणि त्याच्या प्रमुखाला त्यांची उद्दिष्ट्ये निश्चित करून दिली जावीत, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. 'हिंदुस्थान टाइम्स'ला या अहवालाबद्दल माहिती मिळाली आहे.

मेमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. २५ मे रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी राजीनामा दिला. पण याला दोन महिने होऊन गेले तरी अद्याप पक्षाचा पुढील अध्यक्ष कोण असणार हे निश्चित झालेले नाही. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यावर ८ किंवा १० ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. पण या बैठकीचा कार्यक्रम अजून ठरलेला नसल्याचे पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी सांगितले. केवळ अधिवेशन संपल्यावर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मुंबईतील बेस्टच्या डेपोंमध्ये भूमिगत पार्किंग सुविधा? नवा प्रस्ताव

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचा पुढील अध्यक्ष निवडण्यावर चर्चा होऊ शकते.