पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी

बीएसएनएल आणि एमटीएनएलचे विलिनीकरण

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर संचार निगम लिमिटेड (एमटीएनएल) या दोन्ही सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपन्यांची फेररचना करण्याच्या धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. या दोन्ही कंपन्यांचे आता विलिनीकरण करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. 

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, बीएसएनएल किंवा एमटीएनएल या दोन्ही कंपन्या बंद केल्या जाणार नाहीत. त्याचबरोबर या कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूकही केली जाणार नाही. दोन्ही कंपन्या कोणत्याही त्रयस्थ कंपनीला चालवायलाही दिल्या जाणार नाहीत. त्याऐवजी या कंपन्यांचे विलिनीकरण करण्यात येईल. या विलिनीकरणाला मंत्रिमंडळाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. या दोन्ही कंपन्यांमध्ये स्वेच्छानिवृत्तीची योजना लागू केली जाईल. कर्मचाऱ्यांना त्यासाठी खास पॅकेजही देण्यात येईल.