पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानी सैन्याचा अभूतपूर्व निर्णय

इम्रान खान

आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानमधील सैन्याने अभूतपूर्व असा निर्णय घेतला आहे. आर्थिक चणचण असल्यामुळे पाकिस्तानमधील संरक्षणदलाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात ही कपात नेमक्या किती रकमेची आहे हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. पण सैन्याने स्वतःहून कपातीला मंजुरी दिली आहे. पाकिस्तानमधील इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशनचे महासंचालक मेजर जनरल असिफ गफूर यांनी यांनी मंगळवारी त्यांच्या ट्विटर हँडलवरून याची माहिती दिली. 

अजित डोवाल पुन्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

सैन्यावरील खर्चात कपात करण्यात येणार असली, तरी आमच्या संरक्षणसिद्धतेत कोणताही बदल करण्यात येणार नाही. शत्रूविरूद्ध योग्य ती पावले उचलण्यास आम्ही सक्षम राहणार आहोत. फक्त तिन्ही सैन्य दलांच्या अंतर्गत खर्चामध्ये आवश्यक कपात केली जाईल. पाकिस्तानमधील आदिवासी भाग आणि बलूचिस्तानच्या विकासासाठी हे आमचे योगदान आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तेथील सैन्याने स्वतःहून घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले. देश आर्थिक संकटातून जात असताना सैन्याने योग्यवेळी आवश्यक निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशापुढे संरक्षणासंदर्भातील अनेक आव्हाने असतानाही सैन्याने हे पाऊल उचलले हे जास्त अभिनंदनीय असल्याचे इम्रान खान म्हणाले.

मोदी सरकार नौदलासाठी घेणार अत्याधुनिक हेलिकॉप्टर, अमेरिकेशी १७५०० कोटींचा करार

पाकिस्तानमध्ये येत्या ११ जून रोजी चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. यामध्ये सरकारच्या विविध विभागांनी खर्चात कपात करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन याआधीच करण्यात आले आहे. गेल्यावर्षी सत्तेत आल्यानंतर इम्रान खान यांनी आर्थिक गर्तेतून पाकिस्तानला बाहेर काढण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली. त्यांनी पंतप्रधान कार्यालयातील खर्चावरही नियंत्रण आणले.