पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Delhi Results : दिल्ली भाजपच्या कार्यालयात लागले सूचक संदेश असलेले पोस्टर

भाजपच्या कार्यालयात लागलेले ते पोस्टर

दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी सुरू झाली. सुरुवातीच्या कलांप्रमाणे दिल्लीत पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे सरकार येण्याची चिन्हे आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्ली भाजपच्या कार्यालयात लावण्यात आलेले एक पोस्टर आणि त्यावरील संदेशाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

CBSE आणि ICSE शाळांमध्ये मराठी बंधनकारक करण्यासाठी कायदा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो असलेल्या या पोस्टरवर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे की, विजय मिळाल्याने आम्हाला अहंकार येत नाही आणि पराभव झाल्याने आम्ही निराश होत नाही. या संदेशाववरून सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल्समध्येच तिथे पुन्हा एकदा आपचे सरकार येणार असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्याचप्रमाणे मंगळवारी मतमोजणी सुरु झाल्यावर आपचेच उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसते. दुसरीकडे एक्झिट पोल्सचे अंदाज भाजपच्या नेत्यांनी धुडकावून लावले होते. दिल्लीमध्ये सत्ताबदल होणार आणि यावेळी बहुमतासह भाजपचे सरकार येणार असे दिल्ली भाजपचे अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांनी म्हटले होते. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून भाजपला किती जागा मिळणार याचा आकडाही दिला होता. पण परिस्थिती तशी नसल्याचे लक्षात आल्यावर वरील आशयाचे पोस्टर दिल्ली भाजपच्या कार्यालयात लावण्यात आले आहे. 

चीनमध्ये कोरोनामुळे मृत पावलेल्या संख्या १००० पार, ४२००० जणांना लागण

दिल्लीमध्ये २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला केवळ ३ जागांवर यश मिळाले होते. एकूण ६७ जागांवर तिथे आपचे उमेदवार विजयी झाले होते.