पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कष्टाचे फळ!, नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात अमित शहा

अमित शहा आणि नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी गुरुवारी सलग दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधानपद स्वीकारणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी निश्चित झाले असून, त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. यंदाच्या मंत्रिमंडळातील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाजप अध्यक्ष अमित शहा मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात असणार आहेत. त्यांच्याकडे महत्त्वाचे खाते सोपविले जाऊ शकते. अरूण जेटली यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे तूर्त सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिल्यामुळे अमित शहांकडे अर्थखाते दिले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी हिंदूस्थान टाइम्सला दिली.

शपथविधी सोहळ्याचे LIVE UPDATES

भाजपने गेल्या पाच वर्षांमध्ये विविध राज्यात जे घवघवीत यश मिळवले आहे. त्यामध्ये अमित शहा यांचा सिंहाचा वाटा आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही अमित शहा यांनी प्रत्येक राज्यामध्ये भाजपच्या जागा कशा वाढतील, याचे बारीक नियोजन केले होते. त्याचा फायदाही झाला आणि गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा भाजपच्या जागा वाढल्या. याचेच फळ अमित शहा यांना केंद्रात महत्त्वाचे मंत्रिपद देऊन दिले जाणार आहे. 

केंद्र सरकारमधील महत्त्वाच्या अशा संरक्षण विषयक मंत्रिगटाचे सदस्यत्वही अमित शहा यांना मिळेल, अशा पद्धतीने रचना करण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यात तीन ते चार वेळा दीर्घ बैठका झाल्या. यामध्येच कोणाकोणाला यंदा मंत्रिमंडळात स्थान द्यायचे हे निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नंतर अमित शहा हेच केंद्रीय मंत्रिमंडळातील महत्त्वाचे नेते ठरणार आहेत.