पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशाची अर्थव्यवस्था २०२४ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर करण्याचे लक्ष्य - नरेंद्र मोदी

निती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रामध्ये सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या निती आयोगाच्या बैठकीत मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल महत्त्वाचे भाष्य केले. २०२४ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचे लक्ष्य त्यांनी सर्वांसमोर ठेवले. हे लक्ष्य अवघड नक्कीच असले, तरी राज्यांनी आवश्यक मेहनत घेतली तर ते साध्य केले जाऊ शकते, असे मोदी यांनी म्हटले आहे.

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे सरकारचे ध्येय साध्य करण्यात निती आयोग महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे सर्वांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. निर्यात वाढविण्याकडे सर्वांनीच जास्त लक्ष दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. परफॉर्मन्स, पारदर्शकता आणि कामाची पूर्तता याच्या आधारावरच मूल्यमापन केले जाणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेच्या दिशेने आपण प्रवास करीत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

अ‍ॅमेझॉनकडून भन्नाट ऑफर, नोकरी सांभाळून मिळवा वरकमाई!

यंदाच्या सरकारमध्ये नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या जलशक्ती मंत्रालय पाणी व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. पाण्याची बचत आणि त्याचे व्यवस्थापन या क्षेत्रात हे मंत्रालय महत्त्वाचे काम करणार असून, राज्यांनाही या स्वरुपाचे काम सुरू करायला हवे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

दरम्यान, निती आयोगाच्या बैठकीपूर्वी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी घेतली. या बैठकीला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पुद्दूचेरीचे मुख्यमंत्री व्ही नारायणसामी हे उपस्थित होते. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे तब्येत ठीक नसल्यामुळे या बैठकीला उपस्थित नव्हते. ते निती आयोगाच्या बैठकीलाही उपस्थित राहिले नाहीत.