पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी आणि मलेशियाच्या पंतप्रधानांमध्ये चर्चा, झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा मांडला

मलेशियाचे पंतप्रधान डॉ. मोहंमद आणि नरेंद्र मोदी

रशियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महातीर मोहंमद यांची गुरुवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी वादग्रस्त इस्लामिक धर्म प्रचारक झाकीर नाईक याच्या प्रत्यार्पणाचा विषय उपस्थित केला. झाकीर नाईक याच्याविरुद्ध देशात दहशतवादाला खतपाणी घातल्याचे आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

मुंबईत तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा पूर्वपदावर, पावसाची विश्रांती

नरेंद्र मोदी यांनी झाकीर नाईक याला लवकरात लवकर भारताच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी मलेशियाकडे केली. पण मलेशियाच्या पंतप्रधानांनी त्यावर काय भूमिका घेतली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संदर्भात दोन्ही देशांचे अधिकारी एकमेकांच्या संपर्कात राहतील, असे द्विपक्षीय नेत्यांनी यावेळी ठरविले.

परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी या द्विपक्षीय चर्चेनंतर पत्रकारांना त्याबद्दल माहिती दिली. मलेशियाचे पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी यांच्यातील ही दुसरी द्वपक्षीय चर्चा आहे. याआधी गेल्यावर्षी मे महिन्यात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती.

...आता एका रिक्षाचालकाला ठोठावला ४७,५०० रुपयांचा दंड!

गुरुवारी सकाळी नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांचीही भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये विविध द्विपक्षीय विषयांवर चर्चा झाली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:In meeting with Malaysian premier PM Modi seeks extradition of controversial preacher Zakir Naik to India