पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

RSS नेही मोदींना मदत करणं बंद केलंय, मायावतींचा आरोप

मायावती

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीका सुरूच ठेवली आहे. मंगळवारी त्यांनी पुन्हा एकदा मोदींवर टीका करताना आता तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही मोदींना मदत करणे बंद केले असल्याचा आरोप केला. मोदींची नाव आता बुडायला लागली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लोकसभेच्या निकालांनंतर ममता बॅनर्जींचे करायचे काय?, डाव्यांपुढील मोठी अडचण

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचार सध्या सुरू आहे. येत्या १९ मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवून देण्यात आली आहे. मायावती म्हणाल्या, नरेंद्र मोदी यांची नाव आता बुडायला लागली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही त्यांना मदत करणे बंद केले आहे. लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यामुळे यावेळी संघाचे स्वयंसेवकही प्रचारासाठी मैदानात उतरलेले दिसत नाहीत. त्यामुळे मोदी नाराज झाले आहेत.

राजस्थानमधील अलवारमध्ये दलित समाजातील एका महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर नरेंद्र मोदी यांनी मायावती यांच्यावर निशाणा साधला होता. मायावतींमध्ये खरेच हिम्मत असेल, तर त्यांनी राजस्थानमधील काँग्रेस सरकारला दिलेला पाठिंबा काढून दाखवावा, असे आव्हान नरेंद्र मोदी यांनी दिले. या प्रकरणावरून मायावती खोटे अश्रू गाळत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

लोकसभेचे निकाल काहीही येवोत, विधानसभेची तयारी सुरू करा; राज ठाकरेंचे आदेश

नरेंद्र मोदी यांच्या टीकेनंतर लगेचच मायावती यांनी ते घाणेरडे राजकारण खेळत असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर त्यांच्या कार्यकाळात दलितांवर झालेल्या अत्याचारामुळे त्यांनी लगेचच राजीनामा द्यावा, अशी मागणी मायावती यांनी केली होती.