पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... जेव्हा लोकसभेत मंत्र्यांच्या उत्तरावर सत्ताधारी सदस्यच आक्षेप घेतात

रविशंकर प्रसाद

पूर किवा वादळ यासारखी नैसर्गिक आपत्ती येते, त्यावेळी केवळ बीएसएनएल आणि एमटीएनएल या सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपन्यांकडूनच ग्राहकांना मोफत सेवा उपलब्ध करून दिली जाते, या केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या वक्तव्याला सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी आक्षेप घेतल्याचे बुधवारी लोकसभेत पाहायला मिळाले. 

काँग्रेस पराभूत म्हणजे देशाचा पराभव का?, मोदींचा सवाल

लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासावेळी पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना रविशंकर प्रसाद यांनी बीएसएनएल आणि एमटीएनएलकडून देण्यात येणाऱ्या मोफत सेवेचा उल्लेख केला. त्याला सत्ताधारी बाकांवरील राजीव प्रताप रुडी यांनी आक्षेप घेतला. खासगी क्षेत्रातील दूरसंचार कंपन्यांकडूनही नैसर्गिक आपत्तीच्यावेळी मोफत सेवा पुरविली जाते, असे त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याला रविशंकर प्रसाद यांनीही लगेचच प्रत्युत्तर दिले. खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून काही तासांसाठी ही सुविधा मोफत पुरविली जाते. पण सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून नैसर्गिक आपत्तीचे पूर्णपणे निवारण होत नाही, तोपर्यंत मोफत सुविधा दिली जाते, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. 

त्यानंतर राजीव प्रताप रुडी यांनी बीएसएनएल किंवा एमटीएनएलचे कॉल सातत्याने बंद पडतात. तरीही त्यांच्याकडून शुल्क आकारणी केली जाते, हा मुद्दा उपस्थित केला. या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या असल्यामुळे जेव्हा कॉल लागत नाही किंवा तांत्रिक अडचण येते, त्यावेळी ग्राहक सरकारवर टीका करतात, असेही रुडी म्हणाले.

कैलाश विजयवर्गीय यांच्या मुलाची पालिका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण

राजीव प्रताप रुडी यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी बाकांवरील काही सदस्यांनी रुडी यांनाच या खात्याचे मंत्री करा, अशी मागणी उपरोधिकपणे केली. राजीव प्रताप रुडी हे गेल्या मोदी सरकारमध्ये मंत्री होते.