पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसकडूनच SPG सुरक्षा कायद्यात वारंवार बदल, अमित शहांचा पलटवार

अमित शहा

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप अर्थात एसपीजी संबंधीच्या कायद्यात लवकरच सुधारणा केली जाईल. पंतप्रधानपदावरील व्यक्तीला आणि त्यांच्यासोबत त्याच्या निवासस्थानी राहणाऱ्या नातेवाईकांना एसपीजी सुरक्षाकवच देता येते, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत दिली. त्याचवेळी या कायद्यात वारंवार बदल करून त्याचे महत्त्व कमी केल्याचा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला. 

'एकच वादा..अजितदादा', मंत्रिमंडळ स्थापण्याआधी समर्थकांची घोषणाबाजी

नव्या सुधारणांमध्ये माजी पंतप्रधान आणि त्यांच्यासोबत राहणाऱ्या नातेवाईकांनाही पाच वर्षांपर्यंत एसपीजी सुरक्षा देण्याची तरतूद केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. १९९८ चा मूळचा एसपीजी संरक्षणांसंबंधीचा कायदा मागील सरकारने वेळोवेळी बदलला. त्याचे महत्त्व कमी केले गेले, असेही त्यांनी म्हटले आहे. गेल्याच आठवड्यात गांधी कुटुंबातील सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांचे एसपीजी संरक्षण काढून घेण्यावरून केंद्रात वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे शिवसेनेला मुंबईत पहिला धक्का

सुधारणांनंतर एसपीजी कायदा अधिक मजबूत करण्याचे काम आपण करू, असे त्यांनी स्पष्ट केले. देशातील सर्वोच्च शक्तिमान व्यक्ती पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी एसपीजी सुरक्षा तैनात असते.