पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इक्बाल मिर्चीसंबधीत प्रकरणावरून शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला ईडीची नोटीस

राज कुंद्रा

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा हस्तक असणाऱ्या इक्बाल मिर्चीसंबधीत प्रकरणावरून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती व्यावसायिक राज कुंद्राला ईडीनं समन्स बजावला आहे. राज कुंद्रा यांना ४ नोव्हेंबर रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहेत.  यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मिर्चीसोबतच्या जमिनीच्या व्यवहारावरुन ईडीनं समन्स बजावला होता.

आणखी एक घोटाळाः गुडविन ज्वेलर्सकडून कोट्यवधींची फसवणूक 

मिर्चीच्या मालमत्तांचा सौदा करण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या रणजीतसिंग बिंद्रा याच्यासोबत संबंध असल्या कारणावरून चौकशीसाठी राज कुंद्रा यांना नोटीस बजावली असल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. रणजीतसिंग बिंद्राला बेहिशेबी संपत्तीचा सौदा केल्याप्रकरणी यापूर्वी अटक करण्यात आली होती. रणजीत बिंद्रा आणि त्याची कंपनी बास्टेन हॉस्पिटॅलिटीसोबत काही व्यवहार प्रकरणात सविस्तर माहिती हवी आहे, या माहितीसंबधी राज कुंद्रा यांची चौकशी होणार आहे. 

... अशा पद्धतीने शरद पवारांनी आपल्या पक्षाला यश मिळवून दिले