पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद

शहीद जवान सुनील वाल्ते

गेल्या काही दिवसांपासून सीमारेषेवर पाकिस्तान कुरापती करत आहे. पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना दिसत आहे. मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरजवळ भारत आणि पाकिस्तान दरम्यान पुन्हा गोळीबार झाला. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील नायब सुभेदार सुनील रावसाहेब वल्टे (वय ४०) यांना वीरमरण आले. मंगळवारी झालेल्या चकमकीत ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शहीद वाल्ते हे कोपरगाव तालुक्यातील दहिगावचे रहिवासी होते. 

मूसानंतर दहशतवादी संघटना सांभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा

वल्टे हे लवकरच सेवानिवृत्त होणार होते. त्यांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे मुदत वाढवून घेतली होती. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. त्यांचे आई-वडील शेतकरी आहेत. देशातील विविध ठिकाणी त्यांनी सेवा दिली. नुकतीच त्यांना नायब सुभेदारपदी बढती मिळाली होती.

नवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:In exchange of fire in Naoshera sector ahmadnagars Naib Subedar Valte Sunil Ravsaheb martyr