पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

योगदिनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचे ऍनिमेटेड स्वरुपातील योगासनाचे ट्विट

ऍनिमेटेड स्वरुपातील योगासने

येत्या २१ जूनला साजरा करण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मोदी त्रिकोणासान करीत असल्याचे अ‍ॅनिमिटेड स्वरुपात दिसत आहे. 

हेल्थ टिप्स : गाढ झोपेसाठी हे उपाय नक्की करून पाहा

या व्हिडिओसोबत केलेल्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, येत्या २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा होत आहे. तुम्ही सर्वांनी योगविद्येचा आपल्या रोजच्या दिनक्रमात समावेश करावा, अशी माझी विनंती आहे. इतरांनाही योग करण्यास प्रोत्साहित करावे. योगासनांचे अनेक फायदे आहेत. सोबत त्रिकोणासनाचा एक व्हिडिओ देत आहे.

गेल्यावर्षीही नरेंद्र मोदी यांनी विविध आसनांचे व्हिडिओ योगदिनाच्या आधी त्यांच्या ट्विटर हॅंडलवर शेअर केले होते. यावर्षी योगदिनाच्या दिवशी दिल्ली, सिमला, म्हैसूर, अहमदाबाद आणि रांचीमध्ये राष्ट्रीय कार्यक्रम होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच एवढा मोठा शासकीय कार्यक्रम देशात होतो आहे.