पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिकेत २४ तासांत ११६९ जणांचा मृत्यू

ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

कोरोना विषाणूच्या सामना करत असलेल्या अमेरिकेत यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ५९२६ इतकी झाली आहे. गुरुवारी २४ तासांत ११६९ जणांचा यात मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे. आतापर्यंत २४३००० लोकांना याची लागण झाली आहे. 

'कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होईल असे सध्या तरी दिसत नाही'

जॉन हापकिन्स विद्यापीठाच्या मते, मागील २४ तासांत कोरोना विषाणूची नवीन ३० हजार प्रकरणे समोर आली आहेत. गुरुवारी यात ११६९ जणांचा मृत्यू झाला आहे. जो आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. यापूर्वी इटलीमध्ये २७ मार्चला ९६९ जणांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर अमेरिकामध्ये या विषाणूमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ५९२६ इतकी झाली आहे. 

कोविड १९ रुग्णांना मलेरियारोधक औषधे दिल्यास ह्रदयाला धोका, नवे संशोधन

अमेरिकेचे वुहान शहर समजले जाणाऱ्या न्यूयॉर्क शहरात मृत्यू होणाऱ्यांची संख्या १५०० च्या वर गेली आहे. सुमारे ५० हजार लोक यामुळे तिथे संक्रमित झाले आहेत. आतापर्यंत अमेरिकेत एक कोटी ३० लाख लोकांटी कोरोना विषाण चाचणी करण्यात आली आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी मास्क, गाऊन आदि साहित्य संपण्याच्या मार्गावर आहे. 

न्यूयॉर्क टाइम्सने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने वृत्त दिले असून त्यांनी म्हटले की, फेमाने १.१६ कोटींहून अधिक एन-९५ मास्क, ५२ लाख चेहरा झाकण्यासाठीचे उपकरणे, २.२ कोटी रुमाल आणि ७१४० व्हेटिंलेटर दिले होते. आता हे सर्व साहित्य संपण्याच्या मार्गावर आहेत.

कोरोनाशी लढाई: २.२ अब्ज लोकांकडे सतत हात धुवायला पाणीच नाही