पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन कोणाला देऊ नका, सरकारकडून नियमावली जारी

सध्या जगभरात कोरोना विषाणूबाधित रुग्णांना गरजेप्रमाणे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध देण्यात येत आहे.

कोरोना विषाणूबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा वापर कसा करायचा यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक नियमावली जारी केली आहे. यामध्ये कोणत्या रुग्णांना हे औषध देऊ नये, याचीसुद्धा माहिती देण्यात आली आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात भारत मोठ्या प्रमाणात यशस्वी, तरीही...

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने नेमलेल्या कृतीगटाने अभ्यास करून ही नियमावली तयार केली आहे. सध्या कोरोना विषाणूबाधित रुग्णांना लवकर बरे करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध देण्यात येत आहे. चीनमध्ये केलेल्या संशोधनानुसार हे औषध उपयुक्त ठरत असल्याचे समोर आले होते. हे औषध १५ वर्षांखालील मुलांना देऊ नये, असे नव्या नियमावलीत म्हटले आहे. त्याचबरोबर रेटिनोपथी आणि हायपरसेन्सिटिव्हीटी असणाऱ्या रुग्णांनाही हे औषध देऊ नये, असे सूचविण्यात आले आहे. 

सांगलीतील २४ रुग्ण कोरोनामुक्त, मंत्र्यांकडून डॉक्टरांचे अभिनंदन

सध्या जगभरात कोरोना विषाणूबाधित रुग्णांना गरजेप्रमाणे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध देण्यात येत आहे. पण या औषधाचे काही दुष्परिणाम असल्याचे अमेरिकेत करण्यात आलेल्या एका संशोधनातून पुढे आले आहे. त्याचबरोबर कोरोनाबाधित रुग्णांवर हेच औषध असे अजून अधिकृतपणे निश्चित झालेले नाही. या संदर्भात सध्या चाचण्या करण्यात येत आहेत. या चाचण्यांच्या निकालानंतरच या संदर्भात अंतिम रणनिती निश्चित करण्यात येईल. त्यामुळे या गोळ्या कोरोनावर औषध म्हणून व्यावसायिक स्वरुपात विकू नये, असेही नियमावलीत म्हटले आहे.