पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माध्यमांना दिल्या जाणाऱ्या सरकारी जाहिराती २ वर्षे बंद करा, सोनिया गांधींची सूचना

सोनिया गांधी

कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी पाच मुद्दे अधोरेखित करीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. या पत्रामध्ये त्यांनी केंद्र सरकारच्या तिजोरीतून खर्च करून केली जाणारी नूतनीकरण, सौदर्यीकरणाची कामे स्थगित करून तो निधी कोरोना विषाणूशी लढण्यासाठी वापरावा, असे आवाहन केले.

जीवरक्षक औषधांवरील बंदी उठविल्यानंतर राहुल गांधी म्हणाले...

सोनिया गांधी यांनी केलेल्या सूचनामध्ये, पुढील दोन वर्षांसाठी वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या आणि डिजिटल माध्यमे यांना सरकारकडून कोणतीही जाहिरात दिली जाऊ नये. नियोजित जाहिराती रद्द केल्या जाव्यात, असेही म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी देशातील काही महत्त्वाच्या पक्षांच्या नेत्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी या नेत्यांकडून काही सूचना असतील, तर त्या मागविल्या होत्या. त्यामुळे हे पत्र आणि सूचना पाठविण्यात आल्या आहेत, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. 

कोरोना विषाणूशी लढण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये पंतप्रधान, सर्व केंद्रीय मंत्री आणि खासदारांच्या वेतनात ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्षभरासाठी ही कपात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर खासदारांना आपल्या मतदारसंघात विकासासाठी प्रतिवर्षी मिळणारा पाच कोटी रुपयांचा निधीही दोन वर्षांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा सर्व निधी आता कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यात येणार आहे. 

लॉकडाऊनः एमपीएससीची परीक्षा पुन्हा स्थगित

या माध्यमातून सुमारे ७९३० कोटी रुपयांचा निधी उभा राहणार आहे. यापैकी २९ कोटी रुपये हे खासदारांच्या वेतन कपातीतून मिळणार आहेत. देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि सर्व राज्यांचे राज्यपाल यांनीही आपल्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.