पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इम्रान खान यांचे नरेंद्र मोदींना पत्र, शांततेसाठी मिळून काम करण्याचे आवाहन

इम्रान खान आणि नरेंद्र मोदी

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून, दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी मिळून काम करण्याचे आवाहन त्यामध्ये करण्यात आले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनीही त्यांचे भारतातील समकक्ष एस. जयशंकर यांना पत्र लिहिले असून त्यांच्याकडेही याच स्वरुपाचे आवाहन करण्यात आले आहे. पाकिस्तानी परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे.

मुख्यमंत्री फोन करुन काँग्रेस कार्यकर्त्यांना फोडताहेतः चव्हाण

नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमताने निवडून आल्यावर २ जून रोजी इम्रान खान यांनी नरेंद्र मोदी यांना फोन केला होता. त्यावेळी इम्रान खान यांनी नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर इम्रान खान यांनी हे पत्र पाठविले असून, शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारतासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दक्षिण आशियामध्ये दीर्घकालीन शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करणे आणि शांततामय शेजारधर्माचे पालन करणे यासाठी मिळून काम करण्याचे आवाहन पत्राच्या माध्यमातून करण्यात आले आहे. 

२०१६ मध्ये पठाणकोटमधील भारतीय हवाई दलाच्या तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये कोणत्याही पातळीवर द्विपक्षीय चर्चा झालेली नाही. दोन्ही देशांमधील सर्व महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची इच्छा पाकिस्तानची आहे. त्याचबरोबर या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील असल्याचे या माध्यमातून त्या देशाला दाखवून द्यायचे आहे.

'मला माहीत नाही', जजच्या प्रत्येक प्रश्नाला प्रज्ञासिंहांचे एकच उत्तर

पाकिस्तानमधील परराष्ट्र खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने भारताला अशी पत्रे पाठविण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी करण्यात आलेला हा प्रयत्न आहे. परराष्ट्र सचिवांकडून या आठवड्याच्या सुरुवातीलाच ही पत्रे भारतात पाठविण्यात आली आहेत.