पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इमरान खान-मोदी यांच्यात फोनवरुन चर्चा

इमरान खान आणि नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यात रविवारी फोनवरुन चर्चा झाली. एनआयने दिलेल्या वृत्तानुसार इमरान खान यांनी मोदींना फोन केला होता. त्यांनी लोकसभेतील घवघवीत यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी सोबत मिळून काम करण्याची तयारी देखील दर्शवली आहे.   

मोदींनी इमरान यांच्या शुभेच्छा स्वीकारत त्यांचे आभार मानले. विकास आणि प्रगतीसाठी विश्वासासह दहशतवाद आणि हिंसामुक्त वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, अशी आशा मोदींनी यावेळी व्यक्त केली. दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासंदर्भातही यावळी चर्चा करण्यात आली.  
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक संबध तणावपूर्ण झाले आहेत. दरम्यान भारतातील लोकसभा निवडणुकीपूर्वी इमरान यांनी नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा बोलून दाखवली होती. त्यांच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा आतंरराष्ट्रीय राजकिय वर्तुळात रंगली होती.