पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विमानात बिघाड, पाकला जाणारे इम्रान खान यांचे विमान पुन्हा न्यूयॉर्कमध्ये

इम्रान खान (Reuters photo)

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे संयुक्त राष्ट्रात भाषण केल्यानंतर मायदेशात परतत होते. पण तांत्रिक कारणामुळे त्यांचे विमान न्यूयॉर्कला परतले. इम्रान खान हे सौदी अरेबियाने दिलेल्या विमानाने अमेरिकेला गेले होते. या विमानात पंतप्रधान आणि त्यांचे शिष्टमंडळ इस्लामाबादसाठी रवाना झाले होते. ते विमानतळावर परतल्याची माहिती मिळाल्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांना धावत-पळत तिथे यावे लागले. 

अमेरिकेतील पहिल्या शीख पोलिस अधिकाऱ्याची हत्या

द न्यूज इंटरनॅशनलच्या वृत्तानुसार, इम्रान खान शुक्रवारी न्यूयॉर्क येथील केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सौदी अरेबियाने दिलेल्या विशेष विमानाने रवाना झाले. पण विमानात तांत्रिक बिघाडामुळे ते दोन तासाने पुन्हा परतले. इम्रान खान यांना निरोप देऊन गेलेल्या पाकच्या संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी मलिहा लोधी यांना पुन्हा विमानतळावर यावे लागले. 

तंत्रज्ञांकडून विमानातील बिघाड दूर करण्याचे प्रयत्न सुरु असताना इम्रान खान यांनी काही वेळ विमानतळावरच वाट पाहिली. पण नंतर ही दुरुस्ती शनिवारी सकाळी होणार असल्याचे लक्षात आल्यानंतर मलिहा लोधी यांनी त्यांना रुझवेल्ट हॉटेलमध्ये नेले. याच हॉटेलमध्ये इम्रान यांनी ७ दिवस मुक्काम केला होता.

काँग्रेसच्या तिकीट वाटपामध्ये राहुल गांधी लक्ष घालणार नाहीत