पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इम्रान खान अमेरिका दौऱ्यावर, कतार एअरवेज आणि मेट्रोने करावा लागला प्रवास!

इम्रान खान

आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा अमेरिका दौरा सध्या भारतातील सोशल मीडियात चर्चेचा विषय झाला आहे. खर्च कमी करण्यासाठी इम्रान खान खासगी विमानाऐवजी कतार एअरवेजच्या विमानाने अमेरिकेला गेले. तेथील विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी अमेरिकेतील कोणताही वरिष्ठ नेता किंवा मंत्री उपस्थित नव्हता. इम्रान खान यांच्यावर ओढवलेल्या या परिस्थितीची चर्चा सोशल मीडियात रविवारपासून सुरू आहे.

पुण्यात आयटी कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

इम्रान खान हे सध्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. ते सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. कतार एअरवेजच्या विमानाने इम्रान खान आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी हे अमेरिकेला पोहोचेल. वॉशिंग्टनमधील विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी अमेरिकेच्या राजशिष्टाचार विभागाच्या प्रभारी प्रमुख मेरी केट फिशर या उपस्थित होत्या. पण त्यांच्याशिवाय अमेरिकेतील कोणीही मंत्री उपस्थित नव्हते. यावरून सोशल मीडियावर इम्रान खान यांना भारतातील काही जणांकडून ट्रोल केले जाऊ लागले.

विमानतळावरून इम्रान खान आणि शाह मेहमूद कुरेशी हे मेट्रोनेच अमेरिकेतील पाकिस्तानच्या राजदूतांच्या निवासस्थानी पोहोचले. ते तिथेच राहणार आहेत. 
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने नंतर स्पष्ट केले की कोणत्याही देशाचे राष्ट्रप्रमुख हे अमेरिकेच्या दौऱ्यावर येतात त्यावेळी त्यांचे स्वागत राजशिष्टाचार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच केले जाते. त्याप्रमाणे इम्रान खान यांचे स्वागत करण्यात आले आहे. 

काश्मीरमध्ये असेल लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनीची पोस्टिंग

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत इम्रान खान अमेरिकेतील पाकिस्तानी व्यावसायिकांचीही भेट घेणार आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रभारी प्रमुख डेव्हिड लिप्टन आणि जागतिक बँकेचे डेविड मालपास यांचीही ते भेट घेणार आहेत.