पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इम्रान खान यांच्याकडून अणुबॉम्बची धमकी

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान

काश्मीर हा भारत-पाक यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा असल्याचे सांगत चर्चेतून मार्ग काढू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरुन सांगितले. ट्रम्प यांनी देखील मोदींवर विश्वास दर्शवत त्यांच्या मताशी संमती दर्शवली. या दोन दिग्गज नेत्यांच्या चर्चेनंतर पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या जनतेला संबोधित करताना भारतासोबत अणुबॉम्ब युद्धाची भाषा केली. 

इम्रान खान म्हणाले की, सध्याच्या परिस्थिती कोणीही आपल्यासोबत नाही. आपण एकटे पडलो आहोत. काश्मीरच्या मुद्यावर चर्चेतून तोडगा निघाला नाही तर पाकिस्तान अणुबॉम्ब हल्ला करण्यासही मागे पुढे पाहणार नाही. या युद्धाचा परिणाम सर्वनाश एवढाच असेल.  

ट्रम्पसमोर मोदी म्हणाले, काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा, आमचं आम्ही बघू!

काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर पाकिस्तानकडून बेताल वक्तव्य सुरु आहेत. इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रापासून ते मुस्लिम देशांपर्यंत सर्वांकडे धाव घेतली. मात्र कोणीही पाकिस्तानच्या बाजूने उभे राहिले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी काश्मीर हा भारत-पाक यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा असल्याचे मान्य केले. ट्रम्प यांच्यासोबतच्या चर्चेत मोदींनी पाकिस्तानसोबत चर्चेतून मार्ग काढण्याची तयारी दर्शवली. मात्र या दोन नेत्यांच्या बैठकीनंतर पाकिस्तान पंतप्रधानांनी युद्धाची भाषा केल्याने पाकिस्तानचे नापाक इरादे पुन्हा एकदा जगासमोर आले आहेत.