पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मिरच्या मुद्दयावर कोणीच साथ देत नसल्याने इम्रान खान निराश

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान

काश्मिरच्या मुद्द्यावरून भारतावर जागतिक दबाव निर्माण करण्याच्या आपल्या प्रयत्नांना यश मिळाले नसल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वतः कबुल केले आहे. काश्मिरच्या मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय समुदाय पाकिस्तानच्या बाजूने उभा राहत नसल्यामुळे आपण निराश झालो असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे कलम ३७० रद्द करण्यानंतर भारताविरोधात जागतिक जनमत तयार करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पाकिस्तानला आता या प्रकरणावरून सपशेल माघार घ्यावी लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

ट्रम्प म्हणाले, मोदी हे 'फादर ऑफ इंडिया'

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनासाठी इम्रान खान सध्या अमेरिकेत आहे. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एका पत्रकार परिषदेवेळी इम्रान खान म्हणाले, अगदी मोकळेपणाने सांगायचे तर आतरराष्ट्रीय समुदायाच्या भूमिकेने मी निराश झालो आहे. जर काश्मिरींच्या जागी युरोपिय, अमेरिकी लोक असते तर याच समुदायाची प्रतिक्रिया निश्चितपणे वेगळी असली असती, असे त्यांनी म्हटले आहे.

कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मिरमधील नागरिकांवर घालण्यात आलेले निर्बंध मागे घ्यावेत, यासाठी कोणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दबाव टाकत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आंतरराष्ट्रीय समुदाय भारताकडे केवळ एक अब्ज लोकसंख्येचे मार्केट असलेला देश म्हणून बघतो आहे. मानवतेपेक्षा भौतिक गोष्टींना महत्त्व प्राप्त झाले आहे, असेही त्यांनी सांगितले 

धक्कादायक, ड्रोनच्या साह्याने पाकने पंजाबमध्ये पाठवला शस्त्रसाठा

काश्मिरचा मुद्दा प्रत्येक व्यासपीठावर, बैठकीमध्ये उपस्थित करण्याचा प्रयत्न इम्रान खान आणि त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाने केला. पण त्याला यश मिळाले नाही.