पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पाकिस्तानमध्ये ३० ते ४० हजार दहशतवादी सक्रीय'

इम्रान खान

अमेरिका दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. पाकिस्तानमध्ये आजही ३० ते ४० हजार दहशतवादी सक्रीय असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हे दहशतवादी सध्या अफगाणिस्तान आणि काश्मिरमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. तसंच ते त्याठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. इम्रान खान हे सध्या तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. 

मॉब लिंचिंगविरोधात कलाकारांचं पंतप्रधानांना पत्र, कडक शिक्षेची मागणी

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी असा देखील खुलासा केला आहे की, पाकिस्तानमध्ये ४० वेगवेगळ्या दहशतवादी संघटना सक्रीय आहेत. या संघटना पाकिस्तानच्या सीमाभागात काम करत आहेत. याची माहिती पाकिस्तानच्या आधीच्या सरकारला होती. मात्र, त्यांनी अमेरिकेला ते सांगितले नाही. तसंच गेल्या १५ वर्षात पाकिस्तान अमेरिकेची दिशाभूल करत होते असेही त्यांनी सांगितले.  

प्रगती आणि डेक्कन एक्स्प्रेस शुक्रवारपासून १५ दिवसांसाठी रद्द

दरम्यान, 'आमचे सरकार सत्तेमध्ये येण्यापूर्वी आधीच्या सरकारने दहशतवादाचे बिमोड करण्याची राजकिय इच्छाशक्ती दाखवली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी पाकिस्तानच्या आधीच्या सरकारवर जोरदार टीका देखील केली आहे. आमचे पहिले सरकार आहे ज्यांनी दहशतवाद्यांच्याविरोधात कारवाई केली. असे पहिल्यांदा झाले आहे की, आम्ही दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले', असल्याचे इम्रान खान यांनी सांगितले.  

नेटफ्लिक्स आता फक्त १९९ रुपयांत, पण...