पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा मोहम्मद मन्सूर खान अखेर भारतात

मोहम्मद मन्सूर खान

हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून फरार झालेला आय मॉनेटरी ऍडवायजरीचा संस्थापक मोहम्मद मन्सूर खान अखेर शुक्रवारी पहाटे भारतात परतला. त्याला सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. 

मोहम्मद मन्सूर खान शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास नवी दिल्ली विमानतळावर उतरला. तो दुबईहून भारतात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून विशेष तपास पथकाचे अधिकारी मोहम्मद मन्सूर खान याचा शोध घेत होते. तो दुबईत असल्याचे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजले होते. त्यानंतर त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. भारतात येऊन चौकशीला सामोरे जाण्यासाठी त्याचे मन वळविण्यात अधिकारी यशस्वी ठरले आणि तो भारतात परतला.

इस्लामिक वित्तपुरवठा कंपन्यांतील घोटाळ्यानंतर मोहम्मद मन्सूर खान ७ जून रोजी फरार झाला होता. या प्रकरणात आतापर्यंत ४२ हजार गुंतवणूकदारांकडून तक्रारी दाखल झाल्या आहेत. आपल्या कंपन्या तोट्यात जाण्याला अनेक राजकारणी आणि शासकीय अधिकारी जबाबदार आहेत, असे त्याने म्हटले होते. काँग्रेसचे आमदार रोशन बेग यांनी आपल्या कंपनीला देय असलेले ४०० कोटी रुपये अद्याप दिलेले नाहीत, असाही आरोप त्याने केला आहे.