पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आधी पक्ष सोडा मग केजरीवालांचे कौतुक करा, अजय माकन यांनी मिलिंद देवरांना फटकारले

अजय माकन

दिल्लीचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ट्विटरच्या माध्यमातून कौतुक करणारे काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांच्यावर त्यांच्या पक्षातील त्यांचे सहकारी अजय माकन यांनी टीका केली. इतकेच नाही तर आधी पक्ष सोडा मग अरविंद केजरीवाल यांचे कौतुक करा, या शब्दांत अजय माकन यांनी मिलिंद देवरा यांना फटकारले आहे. 

हेरगिरी प्रकरणी नौदलाच्या ११ कर्मचाऱ्यांना अटक

अरविंद केजरीवाल यांनी रविवारी तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याच दिवशी मिलिंद देवरा यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली सरकारच्या कामांचे कौतुक केले. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखाली दिल्ली सरकारने आपले महसुली उत्पन्न दुप्पट करून ६० हजार कोटी रुपयांवर नेले. महसुल उत्पन्नातील वाढ ही गेल्या पाच वर्षांपासून कायम आहे. 

त्यांच्या याच ट्विटनंतर अजय माकन यांनी मिलिंद देवरा यांच्यावर टीका केली. अर्धवट माहितीवर आधारित ट्विट करू नका. तसे करायचे असेल तर आधी पक्षाचा राजीनामा द्या, असे अजय माकन यांनी म्हटले आहे. आपल्या ट्विटमध्ये अजय माकन यांनी दिल्लीमध्ये काँग्रेसचे सरकार असताना तिथे महसुली उत्पन्न कसे वाढत गेले याची माहितीही दिली आहे. 

भगवान रामही भाजपची मदत करु शकले नाहीत, संजय राऊत यांचा टोला

नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने तिथे पुन्हा एकदा यश मिळवले. ७० पैकी ६२ जागांवर आपला विजय मिळाला आहे. तर भाजपला केवळ आठ जागांवर विजय मिळवता आला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:If you want to leave Congress Ajay Makens tweet attack on Milind Deora for Kejriwal praise