पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बंगालमध्ये राहायचे असेल तर बांगला बोलावेच लागेलः ममता बॅनर्जी

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (ANI)

डॉक्टरांच्या संपामुळे अडचणीत आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी विरोधी पक्षांवर हल्लाबोल करत 'बांगला कार्ड' बाहेर काढले आहे. परराज्यातील लोकांच्या बहाण्याने भाजपवर निशाणा साधत ममतांनी बंगालमध्ये राहायचे असेल तर बंगाली भाषा बोलायलाच हवी, असे म्हटले आहे. मी कधीच पश्चिम बंगालचा गुजरात करणार नाही, असे त्या म्हणाल्या. 

उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या रॅलीत त्या बोलत होत्या. आपल्याला बंगाली भाषेला पुढे न्यायचे आहे. मी जेव्हाही बिहार, उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये जाते. तेव्हा त्यांची भाषा बोलते. जर तुम्हाला पश्चिम बंगालमध्ये राहायचे असेल तर तुम्हाला बंगाली यायलाच हवी. मी अशा गुन्हेगारांना कधीच सहन करणार नाही, जे बंगालमध्ये राहतात आणि बाइकवर इकडे-तिकडे फिरतात. 

प. बंगालमधील हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टरांची निदर्शने

ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांच्या संपावरुन भाजप आणि सीपीएमवर टीका केली होती. विरोधी पक्ष डॉक्टरांना भडकावत आहेत. या प्रकरणाला धार्मिक रंग देत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

 

प्रशांत किशोर ममतांना मदत करण्यावरून भाजपमध्ये नाराजी