पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिंसाचार झाला नसता तर पं. बंगालमध्ये भाजप ३० जागा जिकला असता - विजयवर्गीय

कैलाश विजयवर्गीय

पश्चिम बंगालमध्ये जर हिंसाचार झाला नसता, तर तिथे भाजपने ३० जागांवर विजय मिळवला असता, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला देशभरात मिळालेल्या यशात पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या जागा महत्त्वाच्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून भाजपने १८ जागांवर यश मिळवले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ दोनच जागांवर यश मिळाले होते.

कैलाश विजयवर्गीय म्हणाले, बंगालमध्य संपूर्ण प्रचाराच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात गुंडगिरी सुरू होती. त्यावर नियंत्रण आणण्यात निवडणूक आयोग यशस्वी ठरला असता, तर तेथील चित्र वेगळे दिसले असते. भाजप ३० जागांवर विजयी ठरला असता. अनेक ठिकाणी अवैधपणे शस्त्रांचा वापर करण्यात आला. पोलिसांनीही त्यांना मदत केली. त्यामुळे आमच्या जागा कमी झाल्या. 

लोकसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव झालेले १० नेते

प्रचाराच्या काळात पश्चिम बंगालमध्ये जी हिंसा झाली, त्याला ममता बॅनर्जी यांचा अहंकार कारणीभूत आहे. तिथे राजकारण आणि हिंसा हे एकमेकांना पर्याय आहेत. गेल्या तीन दशकांपासून तिथे हेच सुरू आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या हिंसेला कंटाळलेल्या लोकांनी ममता बॅनर्जी यांना निवडून दिले. पण त्या सत्तेवर आल्यावर हिंसाचार कमी होण्याऐवजी आणखी वाढला, असा आरोप त्यांनी केला. लोकांना आता आपल्या निर्णयावर पश्चाताप होतो आहे. त्यांना आता शांतता हवी आहे. त्यामुळेच त्यांनी भाजपला मतदान केले असल्याचे कैलाश विजयवर्गीय म्हणाले.

पूनम महाजन यांच्या मदतीला विलेपार्ले, चांदिवली आले धावून!

पश्चिम बंगालमध्ये होत असलेला हिंसाचार रोखण्यासाठी राज्यात आणखी काही दिवस केंद्रीय सुरक्षा दलांना तैनात ठेवण्याची मागणी आम्ही केंद्र सरकारकडे करणार आहोत. आमचे कार्यकर्ते गुंडांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढील काळात आणखी लोक भाजपमध्ये येतील यासाठी आम्ही प्रयत्न करू. ज्यांना पश्चिम बंगालमध्ये शांतता हवी आहे, ते नक्कीच भाजपला पाठिंबा देतील, असा मला विश्वास आहे, असे कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटले आहे.