पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा काय नाकारू शकतो?, अमरिंदर सिंग यांचा सिद्धूला टोला

अमरिंदर सिंग

जर नवज्योतसिंग सिद्धू यांना दिलेले काम त्यांना करायचे नसेल, तर मी काहीच करू शकत नाही, असे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोमवारी म्हटले आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी रविवारी आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला असल्याचे ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले. सिद्धूने सोमवारी आपला राजीनामा अमरिंदर सिंग यांच्याकडेही पाठवला. त्याचबरोबर मुख्यमंत्री कार्यालयाकडे आपला राजीनामा पोहोचला असल्याचेही त्यांनी जाहीर केले. या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग यांनी वरील वक्तव्य केले आहे.

कुमारस्वामी यांच्या भवितव्याचा फैसला येत्या गुरुवारी

अमरिंदर सिंग म्हणाले, जर सिद्धू यांना दिलेले काम त्यांना करायचे नसेल, तर मी काहीच करू शकत नाही. जनरलने दिलेली जबाबदारी एका सैनिक कशी काय नाकारू शकतो. जर कोणतेही सरकार कार्यक्षमपणे चालवायचे असेल, तर त्यामध्ये शिस्त असली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

रोहितकडे वनडे अन् कोहलीकडे कसोटी नेतृत्वाच्या प्रयोगाचे संकेत

नवज्योतसिंग सिद्धू यांना दिलेली नवी जबाबदारी त्यांनी स्वीकारायला हवी होती. तसे न करता त्यांनी ऐन शेतीकामांच्या मोसमात काम करणेच बंद केले, याबद्दलही अमरिंदर सिंग यांनी खेद व्यक्त केला. नवज्योतसिंग सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहेत. त्यातच मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे नवज्योतसिंग सिद्धू यांना दिलेली खाती अमरिंदर सिंग यांनी काढून घेतली होती. त्यामुळे दोघांमधील दुरावा आणखी वाढला होता. १० जूनला नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेसचे राजीनामा दिलेले अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. पण याबद्दल त्यांनी जाहीरपणे काहीही सांगितले नव्हते. अखेर रविवारी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या राजीनाम्याची माहिती दिली.