पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पीओके भारताला सोपवणंच पाकच्या हिताचं: रामदास आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले

काश्मीरवरुन भारत आणि पाकिस्तानमधील तणाव संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही यात उडी घेतली आहे. आपल्या ताब्यातील काश्मीर (पीओके) भारताला सोपवणे हे पाकिस्तानच्या हिताचे आहे. तेथील लोक पाकवर नाखूष असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांना भारताचा हिस्सा व्हायचा आहे. कलम ३७० हटवण्याचा भारताचा निर्णय त्यांना अजून पचलेला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 

आपल्या मंत्रालयाच्या योजनांची समीक्षा करण्यासाठी चंदीगड आल्यानंतर ते बोलत होते. नरेंद्र मोदी एक उत्साही पंतप्रधान आहेत. त्यांनी कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पाकिस्तानला ते पचवता येत नाहीये. त्यांनी काश्मीर मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. उलट पाकिस्तानने पीओके आम्हाला द्यायला हवा आणि असे करणेच त्यांच्या हिताचे आहे, असे ते म्हणाले. 

VIDEO : ... म्हणून गोळीबार थांबवून पाकिस्तानी सैनिकांनी दाखवला पांढरा झेंडा!

जर त्यांनी पीओके आमच्याकडे सोपवले तर आम्ही तिथे अनेक उद्योग सुरु करु शकतो. आम्ही पाकिस्तानच्या व्यापारात मदत करु. गरिबी आणि बेरोजगारीशी लढण्यासाठीही सहकार्य करु. 

आरपीआय (आ) हरयाणा विधानसभा निवडणुकीतील ९० पैकी १० जागा जिंकणार असल्याचे त्यांनी सांगितले.