पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आघाडी नाही तर नाही... आम्ही सुद्धा स्वतंत्र लढण्यास तयार, अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया

अखिलेश यादव

उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी मंगळवारी जाहीर केल्यानंतर लगेचच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. जर आमचे मार्ग वेगवेगळे असतील. तर हरकत नाही. आम्ही सुद्धा तयार आहोत. सर्वांना आमच्या शुभेच्छा आहेत, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

मायावतींनी 'समाजवादी'वर फोडले पराभवाचे खापर, आघाडीला दिला 'ब्रेक'

पत्रकारांशी संवाद साधताना अखिलेश यादव म्हणाले, जर आघाडी तुटली असेल, तर हरकत नाही. याबद्दल मला खेद व्यक्त करावासा वाटतो. पण जर पोटनिवडणुकीत आघाडी होणार नसेल, तर आम्ही स्वतंत्रपणे सर्व ११ जागा लढण्यास तयार आहोत. समाजवादी पक्ष या सर्व ठिकाणी आपले उमेदवार उभे करेल. 
लोकसभा निवडणुकीत भाजपचा सामना करण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आले होते. पण लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यावर आघाडीवर मतदारांनी विश्वास टाकल्याचे दिसले नाही. उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी केवळ १५ जागांवरच आघाडीचे उमेदवार यशस्वी ठरले. बसपाला १० तर समाजवादी पक्षाला पाचच जागांवर यश मिळाले होते. त्यामुळे आघाडीचे काय होणार, याची चर्चा उत्तर प्रदेशात सुरू होती. मंगळवारी सकाळीच आघाडी तूर्त बाजूला ठेवण्याचा निर्णय मायावती यांनी जाहीर केला. उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या ११ जागांसाठी स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचे त्यांनी जाहीर केले. 

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात ११ जागांवर सध्याचे आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळे तिथे आता पोटनिवडणूक होणार आहे. ११ पैकी ९ ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. तर प्रत्येकी एका ठिकाणी बसपा आणि सपाचे आमदार आहेत. हे सर्व आता खासदार म्हणून लोकसभेत गेले आहेत. 

यंदाची लोकसभा निवडणूक ठरली सर्वांत महागडी, खर्चाचा अंदाज विचार करायला लावणारा

बसपा आणि सपा स्वतंत्रपणे विधानसभेची पोटनिवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता मतदार या निवडणुकीत काय कौल देतात हे बघावे लागणार आहे.