पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राफेलवर ओम नाही तर काय लिहायचे, राजनाथ सिंह यांचा राहुल गांधींना सवाल

राजनाथ सिंह

भारताला मिळालेल्या पहिल्या राफेल विमानाची पूजा करताना मी त्यावर ओम लिहिले होते. काही जणांनी त्यावेळी विचारले की ओम कशाला लिहिले. मला आता राहुल गांधी यांना प्रश्न विचारायचा आहे की ओम नाही तर मग विमानावर काय लिहायचे होते, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. गेल्या आठवड्यात राफेलच्या पूजेवरून राजनाथ सिंह यांच्यावर टीका करण्यात येऊ लागली. काँग्रेससह इतर विरोधकांनी राफेल विमानाची पूजा करण्याची खिल्ली उडविली होती. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी आता राहुल गांधींपुढे प्रश्न उपस्थित केला आहे.

पीएमसी बँक घोटाळा: जॉय थॉमस यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत

राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून राजनाथ सिंह यांच्यावर टीका केली होती. राफेल विमान खरेदी करण्याच्या कोट्यवधी रुपयांच्या करारावरून भाजप नेत्यांच्या मनात अपराध भावना आहे. राफेलचा मुद्दा अजूनही भाजप नेत्यांना झोंबतो आहे. त्यामुळेच राजनाथ सिंह पहिले राफेल विमान घेण्यासाठी फ्रान्सला गेलो होते, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला होता. 

लोकसभा निवडणुकीवेळी राहुल गांधी यांनी राफेल करारामध्ये गैरव्यवहार असल्याचे सांगत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले होते. आपल्या प्रचारामध्ये काँग्रेसने राफेल कराराचा विषय मोठ्या प्रमाणात वापरला होता. तरीही काँग्रेसला या निवडणुकीत मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले होते. 

भाजप यंत्रणांना हाताशी धरुन विरोधकांना धमकावतेय- अशोक चव्हाण

गेल्या आठवड्यात दसऱ्याच्या दिवशी पहिले राफेल विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाले. या कार्यक्रमासाठी राजनाथ सिंह फ्रान्सला गेलो होते. त्यावेळी त्यांनी राफेलची पूज केली होती. त्यावरूनच विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली.