पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

..तर उद्ध्वस्त करुन टाकू, ट्रम्प यांचा इराणला इशारा

डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेच्या हितांवर जर हल्ला केला तर तुम्हाला उद्ध्वस्त केले जाईल, अशा शब्दांत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव सध्या शिगेला पोहोचला आहे. अशात ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यामुळे परिस्थिती आणखी चिघळू शकते. 

...तर परिणामांना सामोरे जावे लागले, ट्रम्प यांची चीनला तंबी!

ट्रम्प यांनी रविवारी टि्वट केले. ते म्हणाले, 'जर इराणला युद्ध करायचेच असेल तर अधिकृतरित्या त्यांचा शेवट होईल. भविष्यात पुन्हा अमेरिकेला कधी धमकी देऊ नका.'

वॉशिंग्टन आणि तेहरान दरम्यान सध्या प्रचंड तणाव आहे. अमेरिकेने एक कॅरियर ग्रूप तसेच बी-५२ बॉम्बरला खाडीत तैनात केले आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावेद शरीफ यांनी आयआरएनए या वृत्तसंस्थेला शनिवारी म्हटले होते की, 'कोणतेही युद्ध होणार नाही. कारण एकतर आम्हाला युद्ध करायचे नाही आणि कोणालाही भ्रम नाही की ते या क्षेत्रात इराणचा सामना करु शकतील.' 

पाकला F-16 विकणारी कंपनी भारताला F-21 देण्यास तयार

यापूर्वी अमेरिकेच्या राजनैतिकांनी सावध केले होते. फारस खा़डीवरुन जाणाऱ्या व्यावसायिक विमानांना जोखिमीचा सामना करावा लागण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती. इराणने अमेरिकेच्या विमानांवर सहज निशाणा साधता येईल असे वक्तव्य केल्यानंतर हे अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी सावध केले होते.

तणावाचे कारण काय..
ओबामांच्या काळात इराणबरोबर पी५+१ देश, जर्मनी आणि यूरोपीय संघाच्या अण्वस्त्र करारावर सहमती बनली होती. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेच्या नव्या सरकारने हा करार रद्द केला. त्यानंतर इराणवर पुन्हा एकदा अमेरिकेकडून बंदी घालण्यात आली आहे.