पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस पराभूत म्हणजे देशाचा पराभव का?, मोदींचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी

मोठ्या कालखंडानंतर देशात संपूर्ण बहुमताचे सरकार सत्तेवर आले आहे. या जनादेशातून लोकांना स्थिर सरकार हवे असल्याचे दिसून येते. हीच स्थिती अनेक राज्यांत दिसून आली. तरीही विरोधक आमच्यावर टीका करत आहेत. वायनाडमध्ये भारताचा पराभव झाला का? रायबरेलीत भारताचा पराभव झाला का? त्रिवेंद्रममध्ये भारताचा पराभव झाला का? अमेठीचे काय? यावर तुम्ही काय बोलणार? काँग्रेस पराभूत झाली म्हणजे भारताचा पराभव झाला काय? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितीत केला. अहंकाराला मर्यादा असते, असे म्हणत काँग्रेसला १७ राज्यांत खातेही उघडता आले नसल्याचे ते म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर ते बोलत होते. आपल्या भाषणात मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व गांधी कुटुंबीयांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी..


या निवडणुकीत ४०-४५ डिग्री तापमानातही लोक रांगामध्ये उभे होते. ८० वर्षांचे वयोवृद्ध ही रांगेत उभे होते. किती प्रयत्नानंतर निवडणूक होते, आणि आपण त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करुन त्याचा अपमान करतो. मला आश्चर्य वाटते की पराभवानंतर माध्यमांवरही तोंडसुख घेण्यात आले. माध्यमांमुळे निवडणुकीत विजय मिळवला आहे का? माध्यमे विकाऊ आहेत का? केरळ आणि तामिळनाडूत हे लागू होईल काय.

निवडणूक आयोगाने आव्हान दिले होते. तेव्हा ईव्हीएमवर हल्लाबोल करणारे त्यावेळी गेले नाही. केवळ दोन पक्ष राष्ट्रवादी आणि कम्युनिस्ट हेच तिथे गेले. इतर लोक निवडणूक आयोगाच्या निमंत्रणानंतरही गेले नाहीत.

२०१४पासून मी पाहत आहे की काँग्रेस पराभव स्वीकार करत नाहीये. मध्य प्रदेशमध्ये काय झाले. आता तर विजय झाला आहे.

काँग्रेस एक देश, एक निवडणुकीच्या बाजूने नाही. अरे चर्चा तर करा. ही वेळेची मागणी होऊ शकत नाही का? आज देशाचे दुर्देव हे आहे की जितक्या निवडणुका, तितक्याच मतदात्यांच्या सुची आहेत. राज्य आणि केंद्र मिळून निवडणूक घ्यावी. निवडणुकीतील बदल अनिवार्य आहे. ते व्हायला हवेत.