पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बाबरी मशिद बेकायदा होती तर ती पाडल्याबद्दल अडवाणीवर गुन्हा का?, ओवेसींचा प्रश्न

असदुद्दीन ओवेसी

जर अयोध्येतील बाबरी मशिद बेकायदा होती तर मग ती पाडण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला आहे आणि जर बाबरी मशिद कायदेशीर आहे तर मग ती जागा लालकृष्ण अडवाणी यांच्या हिंदूत्त्ववादी पक्षकारांना का दिली जाते आहे, असे दोन प्रश्न एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी विचारले आहेत. जर एखाद्याने दुसऱ्याचे घर तोडले तर ती जागा ज्याने घर तोडले त्यालाच कशी काय दिली जाऊ शकते, असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.

खूशखबर! बँक ठेवींवरील १ लाखाच्या विम्यामध्ये लवकरच वाढीची शक्यता

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणाचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दिला. वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्ला विराजमान पक्षकारांना म्हणजे हिंदूत्ववादी पक्षाला देण्याचा निकाल न्यायालयाने दिला. त्याचवेळी येथील एकूण परिसरातील पाच एकर जागा सुन्नी वक्फ बोर्डाला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना असदुद्दिन ओवेसी यांनी वरील प्रश्न उपस्थित केले.

अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

ओवेसी म्हणाले, जर कोणी येऊन तुमचे घर पाडले. त्यानंतर तुम्ही न्यायालयात गेला आणि न्यायालयाने ज्यांनी तुमचे घर पाडले त्याला ती जागा देऊन टाकली आणि त्याबदल्यात तुम्हाला दुसरीकडे जागा दिली तर तुम्हाला कसे वाटेल? यावरूनच एक मूळ प्रश्न निर्माण होतो की जर बाबरी मशिद बेकायदा होती तर मग ती पाडल्याबद्दल लालकृष्ण अडवाणी यांच्यावर गुन्हा का दाखल झाला आहे.