पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आम्ही युद्धासाठी सज्ज, पाक पंतप्रधानांची भारताला धमकी

इम्रान खान

भारताला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. आम्ही युद्धासाठी सज्ज आहोत. दोन्ही राष्ट्रांत पुन्हा युद्ध झाले तर त्याला भारतच जबाबदार असेल, असे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. 

भारत-पाकमध्ये मध्यस्थी करणार नाही, अमेरिकेनं केलं स्पष्ट

स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीचा दिवस पाकिस्तामध्ये स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फरबादमध्ये इम्रान खान यांनी पाक जनतेला संबोधित केले.जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर नाराजी व्यक्त केलेल्या इम्रान खान यांनी यावेळी भारताविरुद्ध युद्धासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीला भारतच जबाबदार असेल, असा उल्लेखही त्यांनी केला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने कोणतीही कारवाई केली तर आम्ही शांत बसणार नाही. पाकिस्तानी लष्करासोबतच सर्व जनता भारताविरुद्ध मैदानात उतरेल, असे ते म्हणाले आहेत. 

पाकने व्यापारी संबंध तोडले, भारतीय उच्चायुक्तांनाही देश सोडण्याचे आदेश

कलम ३७० अंतर्गत जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर  आणि राज्याच्या पुनर्रचनेसंदर्भातील विधेयक मंजूर झाल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला होता. पाकिस्तानने भारताबरोबरील द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडले आहेत.