पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे ICSE आणि ISC बोर्डाच्या परीक्षा स्थगित

आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सीबीएसई बोर्डानंतर आता करण्याचा निर्णय घेतला आहे.  आयसीएसई आणि आयएससी बोर्डाने १० वी आणि १२ वीच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. या परीक्षा ३१ मार्चनंतर घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आयसीएसई आणि आयएससी बोर्डाने देखील परीक्षा स्थगित

उल्हासनगरमधील महिलेला कोरोना, राज्यात बाधितांची संख्या ४७ वर

बोर्डाकडून शाळांना जारी केलेल्या निर्देशामध्ये असे म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता १९ मार्च ते ३१ मार्च दरम्यान घेण्यात येणाऱ्या १० वी आणि १२ वीचे परीक्षा वेळापत्रक स्थगित करण्यात आले आहे.  या परीक्षा ३१ मार्चनंतर घेण्यात येणार आहे. सीआयएससीईकडून (CISCE) गुरुवारी हा निर्णय घेण्यात आला आहे.

चीनमध्ये कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या गेल्या २४ तासांत शून्यावर

दरम्यान, सीबीएसई बोर्डाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बुधवारी १०वी आणि १२वीची परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या परीक्षांबाबत ३१ मार्चनंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले. तर त्याआधी अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईईची परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली. ३१ मार्चनंतर या परीक्षेबाबत नवे वेळापत्रक जारी करण्यात येणार आहे. 

कोरोनाचा रेल्वेला मोठा फटका, आठवड्यात ४५० कोटींचे उत्पन्न बुडाले

चीनच्या वुहान प्रांतातून परसलेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरात भितीचे वातावरण आहे. भारतामध्ये आतापर्यंत १७० नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोनाचे ४७ रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोना विषाणू कृत्रिमपणे तयार केला नसून नैसर्गिकच - शास्त्रज्ञ