पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

या दोन चिनी कंपन्यांचे रॅपिड टेस्टिंग किट वापरु नका: ICMR

कोरोना चाचणीसंदर्भात आयसीएमआरकडून नवे आदेश जारी करण्यात आले आहेत ो

भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) ने रॅपिड अँटिबडीजची तपासणीच्या संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. नव्या सूचनेनुसार चीनमधील दोन कंपन्यांकडून भारतात येणारे रॅपिड टेस्ट किट वापरु नये, अशा सूचना सर्व राज्यांना देण्यात आल्या आहेत. गुआंगजाउ वूंडफो बायोटेक आणि जुहाई लिवजन डायग्नोस्टिक्स अशी या दोन कंपन्यांची नावे आहेत.  अनेक राज्यातून  कोविड-१९ रॅपिड टेस्ट किटच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर आयसीएमआरने हे पाउल उचलले आहे. इतर किटच्या तुलनेत या दोन कंपन्यांनी तयार केलेली किट्स वेगळी आढळून आली असून ती वितरकांना परत करावी, असे आयसीएमआरने म्हटले आहे.

Covid19 टेस्ट किट भ्रष्टाचारावर राहुल गांधी म्हणाले,मोदीजी कारवाई करा!

एखादी व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव्ह आहे की नाही हे ठरवण्यासाठी झटपट निदान करून घेण्यासाठी या चाचणीचा उपयोग केला जातो. सध्याच्या घडीला देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाची तपासणी करण्यासाठी तीन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. व्यक्तीच्या नाकपुड्या किंवा घसा यातून स्वॅबने सॅम्पल घेणे आणि रॅपिड टेस्ट चाचणी याचा यात समावेश आहे. पहिल्या चाचणीमध्ये स्वॅब नमुने घेतले जातात आणि व्हायरल ट्रान्स्पोर्ट मीडिअम (व्हीटीएम) कंटेनरमधून हे नमुने चाचणी केंद्राकडे पाठवले जातात. याचे निदान अचूक असल्यामुळे याच चाचणीचा वापर करावा, अशा सूचनाही हे आयसीएमआरकडून देण्यात आल्या आहेत.

पुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे

रॅपिड डायग्नॉस्टिक टेस्ट ही फिंगरप्रिक ग्लुकोज टेस्टिंगसारखी असून या चाचणीमध्ये, फिंगरप्रिक टेस्ट करून एक थेंब रक्त घेतले जाते, हे रक्त टेस्टिंग डिव्हाइसवर ठेवून चाचणी केली जाते व याचा निर्णय केवळ ३०   मिनिटांत समजण्यास मदत होते. यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोविड रॅपिड किटमध्ये समस्या असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या.