पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कोरोनाचा एक रुग्ण ३० दिवसांत ४०६ जणांना करु शकतो बाधित'

केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपादरम्यान भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषदेचा (आयसीएमआर) एक अहवाल समोर आला आहे. कोरोना विषाणूबाधित एका रुग्णाने जर लॉकडाऊनचे पालन केले नाही किंवा सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब केला नाही तर तो ३० दिवसांत ४०६ जणांना संक्रमित करु शकतो, असे या अहवालात समोर आले आहे. जर त्यांनी लॉकडाऊनचे पालन केले तर केवळ २.५ लोकच यामुळे बाधित होऊ शकतात. ही माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 

कोविड-१९ : केंद्र सरकारनेही दिले लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे दिल्ली, मुंबई, भिलवाडा, आग्रामधील छोटे छोटे परिसर शोधून ते सील करण्याची रणनीति आखण्यात आली आहे. देशात आतापर्यंत एकूण ४४२१ लोक कोरोनाबाधित झाले आहेत. गेल्या २४ तासांत ३५४ नवी प्रकरणे समोर आली आहेत. तर मागील २४ तासांत देशात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३२६ व्यक्ती बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

माध्यमांच्या सरकारी जाहिराती २ वर्षे बंद करा - सोनिया गांधी

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, लॉकडाऊन दरम्यान भारतीय रेल्वेने २५०० डब्यात ४०००० आयसोलेशन बेड तयार केले आहेत. ते दररोज ३७५ बेड तयार करत आहेत. यावर देशातील १३५ ठिकाणी काम सुरु आहे. 

गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, आवश्यक वस्तू आणि सेवांची स्थिती समाधानकारक आहे. गृहमंत्र्यांनी आवश्यक वस्तू आणि लॉकडाऊन उपायांच्या स्थितीची विस्तृत समीक्षा करण्यात आली आहे. साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

'हनुमानासारखा पर्वत उचलायचा नाही, घरी थांबूनच जयंती साजरी करा'

दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सध्या रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICMR study suggests 1 COVID-19 patient can infect 406 people in 30 days if does not follow lockdown social distancing says Health ministry